क्षण हे येती, क्षण हे जाती,
सागरांच्या लाटांसारखी उसळती.
सुखाचे क्षण आणती स्मित हास्य,
दुखाचे क्षण न्हेती ते स्मित हास्य.
क्षण हे येती, क्षण हे जाती,
सागरांच्या लाटांसारखी उसळती.
सुंदर असती काही क्षण जी मनाला भावती,
असे क्षण खूप कमी असती.
साठवावे ते मनातच नेहमी,
दुखाच्या क्षणी नेहमी आठवावी.
क्षण हे येती, क्षण हे जाती,
सागरांच्या लाटांसारखी उसळती.
हळुवार कानात येऊन छळती,
गालावरच्या खळीला अजून फुलवती.
क्षणो क्षणी हसत राहावे,
आनंद पसरावे चोहीकढे.
आनंदाचे क्षण हे इतके साठवावे,
कि, दुखाचे क्षण दुरूनच पळती....
सागरांच्या लाटांसारखी उसळती.
सुखाचे क्षण आणती स्मित हास्य,
दुखाचे क्षण न्हेती ते स्मित हास्य.
क्षण हे येती, क्षण हे जाती,
सागरांच्या लाटांसारखी उसळती.
सुंदर असती काही क्षण जी मनाला भावती,
असे क्षण खूप कमी असती.
साठवावे ते मनातच नेहमी,
दुखाच्या क्षणी नेहमी आठवावी.
क्षण हे येती, क्षण हे जाती,
सागरांच्या लाटांसारखी उसळती.
हळुवार कानात येऊन छळती,
गालावरच्या खळीला अजून फुलवती.
क्षणो क्षणी हसत राहावे,
आनंद पसरावे चोहीकढे.
आनंदाचे क्षण हे इतके साठवावे,
कि, दुखाचे क्षण दुरूनच पळती....
Comments