Skip to main content

Posts

Showing posts from June, 2011

फक्त आपण!!!!!!

डोळ्यात अश्रू, पण चेहृयावर हसू... मनात खूप वादळ, पण जीवनात चालू नेहमीची पळापळ.... एकांतात येतात तुझ्या आठवणी, लोकांच्या गर्दीत मी वाट पाहते फक्त तुझी..... तुझ्याविना जगणं खूप कठीण झालय, पण तू राहू शकतो माझ्याविना हे लक्षात आलय.... मनात नेहमी तो विश्वास राहील, कधी ना कधी कुठेतरी चुकून तू भेटशील.... तुला सद्य्व आनंदी पाहायचं आहे मला, तू नसला माझ्या आयुष्यात तरीही नेहमीच जवळचा असशील मला..... त्या सुंदर आठवणी, निरंतर गप्पा, एक क्षण ही एकमेकांशिवाय असह्य करणारा, न बोलता समजणारे, एकमेकांना नेहमी हसवणारे, आपलं हे नातं आयुष्यभर लक्षात राहील मला.....

Mumbai, a city forgetting basic humanity......

Mumbai, a city full of life, happenings every moment, bright and dark alleys, a city messed up by its own people, a city with moments of joy and melancholy. Millions of people spread across this beautiful city have millions of varied nature people around. The moment you step out on the roads of Mumbai, you will enjoy every moment seeing the vibrant mixture around you. A city with a crowd boisterous, running ahead of time, working in a cliché manner every single day is a picturesque to watch around not just for photographers to capture them all, but for everyone staying in this huge city. The other day, Mom and me along with the other crowd of Mumbai were waiting at the bus stop for the most expected bus to a particular destination. The cabbies would not budge to take us to the place where we wanted to go so they left us no choice but wait for almost 30 mins. for the BEST transport. Finally seeing the red vehicle wading its way from the heavy traffic

चंद्रास पाहूनी.....

पोर्णिमेचा चंद्र, शुभ्र टवटवीत दिसतो रात्री, लखलखता प्रकाश पाडतो त्या गदड अंधारी..   मन हे अगदी व्याकुळ होई त्या चंद्रास पाहूनी, शोधते मी रात्रभर त्यात आपल्या सुंदर आठवणी....

पावसात त्या......

वारा सुटलाय अगदी बेभान, पावसाची चाहुल देतोय हा प्रत्येक क्षण, हळूवार थेंब, मुसळधार पाऊस सोबत  आहे सुंदर आठवण. त्या पूर्वीच्या दिवसात पावसात भिजायचो आपण एकत्र सोबत, गारगार वारा, भीजलेले आपण, हातात हात धरून होतो शहारत. भीजलेला माझा चेहरा तुला खुणावत होता काहीतरी, एकमेकांच्या घट्ट मिठीत धरून ठेव असं खुणावत होतो दोघेही. पावसाच्या त्या ओल्या आठवणी नेहमीच असतात माझ्या ह्रुदयी, प्रत्येक पावसाचा थेंब मला चाहूल देतो सतत तुझी, त्या जुन्या आठवणी आणतात डोळ्यात नकळत पाणी.

पाठवणी......

मुलगी जन्माला आली, आई बाबांचा आनंद गगनात न मावी.. हर्षुनी जाती मनं ही त्यांची, आनंदाश्रु डोळ्यात मावेनाशी .... फुलपाखरूसारखे जपतात तिला, काही पाहिजे नाही ते नेहमी देतात तिला.... तिचा आनंद सर्वस्व असतो त्यांच्यासाठी, तिच्या डोळ्यातील एक अश्रुही जणू एक हृदयाचा चुकलेला ठोका मानती...... तिच्या डोळ्यातील स्वप्न म्हणजे, त्यांच्या जगण्याचे एकमेव ध्येय असे......  बाबांचा धाक सातच्या आत घरात येणं, आणि उशीर झाला की ओरडा खाऊन, आईच्या कुशीत शिरून रडणं.....  तिचा आवडता ड्रेस आईला फक्त माहीत, तिचा न आवडता पदार्थ बाबांना चांगलाच माहीत, कारण मुली ह्या नेहमी वडिलांवर जातात, असं सगळेच म्हणत असतात.....  तिचं पहिलं प्रेम ती फक्त आईशी बोलते, तिला पहिला जॉब मिळाला की बाबांना फ़ोन लावते...... कित्ती सुंदर हे लेकीसोबतचं नातं असतं, लग्न ठरलं की त्यांच्या डोळ्यात अश्रु ही सावरत नसतात...... कन्यादान नशिबी आल्यामुळे एक वेगळाच आनंद असतो, पण पाठवणीची वेळ आली की वडिल आडोश्याला उभे राहती, सासरी निघालेल्या आपल्या फुलपाखरुला डोळे भरून पाहती..... काय बोलावं हे त्यांना समजेना, दुःखाचे ते अश्रु लपवून,

ग्रहण.....

ग्रहण हे काय असतं!!! ग्रहण हे सूर्य व् चंद्रालाच का होतं!!!! एक दिवसभर तापलेला ग्रह, लपतो एखाद दिवस, घेतो क्षणभर विश्रांति.... सुंदर असे ते क्षण असते, जेव्हा सूर्यावर सावली पडून  सोन्याची अंगठी दिसते..... सुंदर रोमांचित अश्या चंद्रावरसुद्धा, सावलीचे प्रेम उतू जाते की, मिठी काही क्षण सुटतंच  नसते..... का म्हणतात ग्रहणाला अशुभ, पण खरा अर्थ - ग्रह अन ग्रहांमधील पवित्र नात्यातील ते विरह, काही क्षणांसाठीच मिटलेले असते.....

हां पाउस पहिला.....

आला रे आला, पाउस आला... आतुर झाले सगळे त्याची वाट पाहून, आणि तो आला आज नकळत.... वारा सुटलाय मस्तं बेभान, त्रस्त करणारा सूर्य ढगांमध्ये, घाबरून बसला गप्प जाउन.... तापलेले रस्ते आणि लोकांची डोकी, झाले थंडगार ओलेचिंब, अगदी मनसोक्त होउन ..... सुकलेल्या झाडांची पाने, नाचू लागली हिरवेगार होउन, पाडत थंड पावसाची थेंबे.....    ओलावा तो हवाहवासा वाटणारा, आला शेवटी घेउन, हां पाउस पहिला..... पहिला पाउस, गारगार वारा, ओल्या मातीचा तो सुंदर गंध, न्हावुन निघाले सर्वंकाही चोहिकडे.... गाड्यांच्या खिडक्या बंद झाल्या पटापट, लहान मोठे सर्व भिजत आहेत हसत हसत.... वारा सुटला आहे अगदी गारगार, चिंब भिजलेल्या अंगावर आला शहार.... ओलेचिंब होणारे जग पाहून, इंद्र देवही खुश होउन गर्जत आहे जोरजोरात....