Skip to main content

Posts

Showing posts from September, 2010

मन हे माझे !!!!!

मन  हे माझे का विचार करतं  तुझा सतत, का कळा लागती जिव्हाला तुझ्या आठवणीत!!! तुझी ओढ असूनही का दुरावा हा सहन करी, मन हे माझे का सतत तुझ्या कढेच वळू  लागे!!! तुला भेटता क्षणी ऋणानुबंध जुळू लागले, का कोणास माहित, पण मन हे तुझ्यापुढे माझे झुकले!!!! मनातील हुरहुरी, हृदयातील ठोके, धावू लागती फ़क़्त तुझ्याच एका नझ्रेमुळे .. कसं सांगू, कसं समजावू ह्या वेड्या मनाला, कि समजावू ह्या हृदयाला हेच मला समजेना!!!!

Just For you!!!!

The lonely times, reminds of the lovely times.. Your thoughts are always on my mind, your name always in my heart.. You must have forgotten but my heart is only towards u driven... Your heart beats for someone else, but my heart beats with your name always... Days n nites pass as always but not like those lovely times!!!!!

Sometimes.....

Sometimes your own decisions can hurt u so much, Sometimes your own love n care can leave u alone, Sometimes your trust on someone can be broken at any moment, Sometimes your honesty can prove you wrong, Sometimes your silence can create misunderstanding, Sometimes your own people become strangers, Sometimes so many things can happen, that you won't realize how n why it happened!!!!!

माझिया प्रियेला प्रीत कळेना !!!!!!

न काही बोलता, केलेल्या खुणांना इशारा म्हणतात. न काही बोलता, तुम्हाला समज्नार्याला खरा प्रियकर म्हणतात. पण सांगून हि न समज्नार्याला काय म्हणावं? माझिया प्रियेला प्रीत कळेना, कसे समजवावे हेच मला समजेना. विचार जुळती, मन हि जुळती, हृदयाचे ठोके वाढू लागती त्याच्या नुसत्या आठवणींनी . मग का हे बंधन जुळे ना, का तो मला समजून घेईना? माझिया प्रियेला प्रीत कळेना, कसे समजवावे हेच मला समजेना.

आयुष्य!!!!

किती सुंदर हे जीवन आहे जे जगण्यात इतकी मज्जा आहे... इतके दिवस-रात्र , इतके उन पाऊस, इतके सुख दुख, इतके विचार. इतकी लोकं, त्यात काही आपली तर काही परकी.. काही न काही घडत असतं, काही न काही आपण घडवत असतो. ह्या आयुष्यात आपले प्रेमळ आई-बाबा , आपल्यावर प्रेम करणारा कुणीतरी कुठेतरी आहे ह्या विचारात जगतो. लोकं येतात लोकं जातात, कुणी थोड्या काळात विसरतात, कुणी आयुष्यभर लक्षात राहतात. इतके हास्य, इतके अश्रू , इतके प्रेम, इतकी मैत्री, सर्वकाही घडतं या एका आयुष्यात!!! जगा  हे आयुष्य प्रत्येक क्षणी, पूर्णपणे, कि आयुष्याला हि वाटे अजून  काही काळ थांबावसे !!!!!

ओढ.....

थंडगार हवा, मुसळधार पाऊस, हिरवळ हि चोहीकध्ये खुणावती काहीतरी.. हळूच येणारा वारा, कानात कुजबुजत काहीतरी.. मन हे वेडे माझे, समजत नाहीतरीही, तुझीच ओढ लावत आहे हेच मला काळात नाही!!!!

अश्रू !!!!!!

अश्रू अश्रू हे डोळ्यातले पाणी नाही नुसते, ते आहेत सुख दुख मनातले. मनात विचार उसळती, डोळ्यातून वाट काढती.. आनंद अति झाल्यास किंवा दुख अनावर झाल्यास, अश्रू येती नकळतच.. पावसाच्या त्या धारांमध्ये, अश्रू दिसत नाहीत डोळ्यांमध्ये ...

आई....

आई.... आई तू अशी कशी ग आई!!!! सुखाची सावली, दुखाचा आधार.. तुझ्याशिवाय नाही जीवनाला काही आकार!!! आई तू अशी कशी ग आई!!!! कळा  त्या सोसत तू आम्हाला हसवती, स्वतच्या दुखांना विसरून, सुख आम्हास दाखवती.. चांगल्या वाय्टांचा अर्थ फ़क़्त तूच नीट समजवती!!! आई तू अशी कशी ग आई!!!! मन हे व्याकुळ होती, अंधारात घाबरून जाती, तेव्हा तुझ्याच कुशीची आठवण आम्हास येती.. तुझ्या त्या घटत मिठीची ओढ सतत जाणवती!!! आई तू अशी कशी ग आई!!!! चूक केल्यावर तू ओरडती, ती सुधारण्याची वाट दाखवती.. परत कधीच त्या चुकीची आठवण नाही करवती!!!! आई तू अशी कशी ग आई!!!! तूच आहेस आमचा आधार, तुझ्याविना जीवनाला नाही काही अर्थ.. तुझ्याच श्वासाशी जडला आहे माझा श्वास अंतःकरणाचा!!!

क्षण

क्षण हे  येती, क्षण हे जाती, सागरांच्या  लाटांसारखी उसळती. सुखाचे क्षण आणती  स्मित हास्य, दुखाचे क्षण न्हेती ते स्मित  हास्य. क्षण हे येती, क्षण हे जाती, सागरांच्या  लाटांसारखी उसळती. सुंदर असती काही क्षण जी  मनाला भावती, असे क्षण खूप कमी असती. साठवावे ते मनातच नेहमी, दुखाच्या क्षणी नेहमी आठवावी. क्षण हे येती, क्षण हे जाती, सागरांच्या  लाटांसारखी उसळती. हळुवार कानात येऊन छ ळ ती ,   गालावरच्या खळीला अजून फुलवती. क्षणो क्षणी हसत राहावे, आनंद पसरावे चोहीकढे. आनंदाचे क्षण हे इतके साठवावे, कि, दुखाचे क्षण दुरूनच पळती....