मुलगी जन्माला आली,
आई बाबांचा आनंद गगनात न मावी..
हर्षुनी जाती मनं ही त्यांची,
आनंदाश्रु डोळ्यात मावेनाशी ....
फुलपाखरूसारखे जपतात तिला,
काही पाहिजे नाही ते नेहमी देतात तिला....
तिचा आनंद सर्वस्व असतो त्यांच्यासाठी,
तिच्या डोळ्यातील एक अश्रुही
तिच्या डोळ्यातील एक अश्रुही
जणू एक हृदयाचा चुकलेला ठोका मानती......
तिच्या डोळ्यातील स्वप्न म्हणजे,
त्यांच्या जगण्याचे एकमेव ध्येय असे......
बाबांचा धाक सातच्या आत घरात येणं,
आणि उशीर झाला की ओरडा खाऊन,
आईच्या कुशीत शिरून रडणं.....
तिचा आवडता ड्रेस आईला फक्त माहीत,
तिचा न आवडता पदार्थ बाबांना चांगलाच माहीत,
कारण मुली ह्या नेहमी वडिलांवर जातात,
असं सगळेच म्हणत असतात.....
तिचं पहिलं प्रेम ती फक्त आईशी बोलते,
तिला पहिला जॉब मिळाला की बाबांना फ़ोन लावते......
कित्ती सुंदर हे लेकीसोबतचं नातं असतं,
लग्न ठरलं की त्यांच्या डोळ्यात अश्रु ही सावरत नसतात......
कन्यादान नशिबी आल्यामुळे एक वेगळाच आनंद असतो,
पण पाठवणीची वेळ आली की वडिल आडोश्याला उभे राहती,
सासरी निघालेल्या आपल्या फुलपाखरुला डोळे भरून पाहती.....
काय बोलावं हे त्यांना समजेना,
दुःखाचे ते अश्रु लपवून, कंठ दाटून आले तरीही,
हसत हसत जिव्हाच्या त्या तुकड्याला सासरी पाठवी......
Comments