आला रे आला, पाउस आला...
आतुर झाले सगळे त्याची वाट पाहून,
आणि तो आला आज नकळत....
वारा सुटलाय मस्तं बेभान,
त्रस्त करणारा सूर्य ढगांमध्ये,
घाबरून बसला गप्प जाउन....
तापलेले रस्ते आणि लोकांची डोकी,
झाले थंडगार ओलेचिंब,
अगदी मनसोक्त होउन .....
सुकलेल्या झाडांची पाने,
नाचू लागली हिरवेगार होउन,
पाडत थंड पावसाची थेंबे.....
ओलावा तो हवाहवासा वाटणारा,
आला शेवटी घेउन,
हां पाउस पहिला.....
पहिला पाउस, गारगार वारा,
ओल्या मातीचा तो सुंदर गंध,
न्हावुन निघाले सर्वंकाही चोहिकडे....
गाड्यांच्या खिडक्या बंद झाल्या पटापट,
लहान मोठे सर्व भिजत आहेत हसत हसत....
वारा सुटला आहे अगदी गारगार,
चिंब भिजलेल्या अंगावर आला शहार....
ओलेचिंब होणारे जग पाहून,
इंद्र देवही खुश होउन गर्जत आहे जोरजोरात....
Comments
you have brought out the sights and sounds of the first rain very well :-)