लग्न म्हणजे नुसतं दुसऱ्या व्यक्तीचं तुमच्या बरोबर राहणं नसतं.
लग्न म्हणजे दोन जिव्हांच एक अतूट नातं असतं.
सप्तपदी, मंगलाष्टक, रुकवत, उखाणे, मंगळसूत्र, हिरवा चुडा,
ह्या सर्वांचा मेळ म्हणजे नसतं लग्न.
दोन जिव्हांमध्ये असलेला आंधळा विश्वास, एक निरंतर निरपेक्षित,
निःस्वार्थ प्रेमाचं बंधन म्हणजे असतं लग्न.
स्त्रीचं स्त्रीत्व आणि मातृत्व नसतं नुसतं लग्न,
दोन्ही जिव्हांना असणारा नितांत आदर आणि आधार म्हणजे असतं लग्न.
आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन नसतं नुसतं लग्न,
पण एकमेकांशिवाय जगणं असह्य होणं, म्हणजे असतं लग्न.......
Comments