चन्द्र आज जवळ होता,
काय ते समजत नव्हतं,
पण तुझ्याविना मन कुठेही वळत नव्हतं.....
रात्र ही चढत होती,
पण झोप काही येत नव्हती.....
मन अगदी सुनं होतं,
ह्रुदयाचे ठोके वाढत होते,
कसली ओढ़ लागली हे समजुनही,
नको तुझा विचार, असं म्हणून रात्र ही ढकलत होती.....
तुला सुद्धा असं काही होत नसेल ना,
असा विचार सतत मन माझं करत होतं......
Comments