सुंदर एका सायंकाळी, तिच्या सोबत त्याच वाटेने फिरताना,
येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?
समुद्राकाठी कट्ट्यावरची, ती नेहमीची जागा सोडून,
तो बसेल तिच्या सोबत, वेगळ्या ठिकाणी,
येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?
हातात हात घेउन, बसतील दोघंही,
पहिला स्पर्श असेल तो तिचा,
येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?
गप्पा रंगतील दोघांच्या, त्या सुंदर वेळी,
हस्ताहस्ता लागेल त्याला उचकी,
येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?
प्रेम म्हणावे हे वेडे, की म्हणावे नुस्ती मैत्री,
मी ही होती एक मैत्रीण त्याची,
येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?
वेडं हे मन माझं, आठवणीत गूरफटलेलं,
शेजारी बसलेल्या माझ्या प्रियकराला विसरून गेले त्या क्षणाला,
येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?
येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?
समुद्राकाठी कट्ट्यावरची, ती नेहमीची जागा सोडून,
तो बसेल तिच्या सोबत, वेगळ्या ठिकाणी,
येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?
हातात हात घेउन, बसतील दोघंही,
पहिला स्पर्श असेल तो तिचा,
येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?
गप्पा रंगतील दोघांच्या, त्या सुंदर वेळी,
हस्ताहस्ता लागेल त्याला उचकी,
येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?
प्रेम म्हणावे हे वेडे, की म्हणावे नुस्ती मैत्री,
मी ही होती एक मैत्रीण त्याची,
येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?
वेडं हे मन माझं, आठवणीत गूरफटलेलं,
शेजारी बसलेल्या माझ्या प्रियकराला विसरून गेले त्या क्षणाला,
येइल का गं त्या क्षणी त्याला आठवण माझी?
Comments