डोळ्यात अश्रू, पण चेहृयावर हसू... मनात खूप वादळ, पण जीवनात चालू नेहमीची पळापळ.... एकांतात येतात तुझ्या आठवणी, लोकांच्या गर्दीत मी वाट पाहते फक्त तुझी..... तुझ्याविना जगणं खूप कठीण झालय, पण तू राहू शकतो माझ्याविना हे लक्षात आलय.... मनात नेहमी तो विश्वास राहील, कधी ना कधी कुठेतरी चुकून तू भेटशील.... तुला सद्य्व आनंदी पाहायचं आहे मला, तू नसला माझ्या आयुष्यात तरीही नेहमीच जवळचा असशील मला..... त्या सुंदर आठवणी, निरंतर गप्पा, एक क्षण ही एकमेकांशिवाय असह्य करणारा, न बोलता समजणारे, एकमेकांना नेहमी हसवणारे, आपलं हे नातं आयुष्यभर लक्षात राहील मला.....