काम करणं सोपं असतं,
पण बाहेरच्या तापलेल्या रस्त्याला विचारा,
एवढ्या गाड्यांच वज़न प्हेलणं किती सोपं असतं?
मोट्ठ्या, सुखसोयी असलेल्या ऑफिस मध्ये,
काम करणं सुद्धा कधीकधी डोक्याला ताप असतो,
पण हेच ऑफिस घडवणार्याला विचारा
डोक्यावर रणरणत्या उन्हाचा ताप किती असतो?
थोडं जास्तं काम केलं की,
आपल्याला अशक्तपणा लगेच येतो,
पण "अशक्तपणा" काय हे
रस्त्याकडच्या एक वेळा पाव खाणार्या गरीब मुलाला विचारा?
वाढली गर्मी की ए.सी कधी लावणार,
हा प्रश्न सर्वांना पडू लागतो,
पण डोक्यावर छत नसलेल्यांना,
"आई गं, कित्ती ही गर्मी", हा विचार कधीच का नसतो?
सुंदर असं, "आपलं घर"
प्रत्येकाला हवं असतं,
पण गरीब नगरात ते,
सुंदर आयुष्य कसं कुणी जळवू शकतं?
माणूस हा गरीब असो वा श्रीमंत,
जगण्यासाठी पाणी व् हवा मात्रं सगळे एकच घेतात,
पण एकसारखं जीवन जगणं
प्रत्येक मनुष्याला नाही का वाटत असतं?
Comments