Skip to main content

Posts

Showing posts from March, 2011

At this very moment!!!!!

Walking alone besides the sea, the evening sunset, the breeze can feel me... The sun at the noon makes me feel crazy hot, but the same sun now bothers me not... The red sun setting down at this hour is all alone in the sky, then why me walking alone out here cry... The sea is at peace, but the breeze is not, looking at the sea, the breeze hits my face asking, "Why not me?" Am not sad at this moment but, am thinking why am I walking alone at this very moment!!!!!

इतकं सोपं असतं????

मस्तं थंड ए.सी ऑफिस मध्ये बसून,  काम करणं सोपं असतं, पण बाहेरच्या तापलेल्या रस्त्याला विचारा, एवढ्या गाड्यांच वज़न प्हेलणं किती सोपं असतं?  मोट्ठ्या, सुखसोयी असलेल्या ऑफिस मध्ये, काम करणं सुद्धा कधीकधी डोक्याला ताप असतो, पण हेच ऑफिस घडवणार्याला विचारा  डोक्यावर  रणरणत्या उन्हाचा ताप किती असतो? थोडं जास्तं काम केलं की, आपल्याला अशक्तपणा लगेच येतो, पण "अशक्तपणा" काय हे  रस्त्याकडच्या एक वेळा पाव खाणार्या गरीब मुलाला विचारा? वाढली गर्मी की ए.सी कधी लावणार, हा प्रश्न सर्वांना पडू लागतो, पण डोक्यावर छत नसलेल्यांना, "आई गं, कित्ती ही गर्मी", हा विचार कधीच का नसतो? सुंदर असं, "आपलं घर" प्रत्येकाला हवं असतं, पण गरीब नगरात ते, सुंदर आयुष्य कसं कुणी जळवू शकतं? माणूस हा गरीब असो वा श्रीमंत, जगण्यासाठी पाणी व् हवा मात्रं सगळे एकच घेतात, पण एकसारखं जीवन जगणं प्रत्येक मनुष्याला नाही का वाटत असतं?

पुन्हा एकदा.....

असं नेहमीच होत नसतं, की  आपल्याला जे पाहिजे ते मिळतच असतं.... मग काय करावं हे मनाला सुचत नसतं.... मनात आपल्या अनेक विचार, अनेक स्वप्न, अनेक आशा असतात,  पण सर्वच काही पूर्ण होतील अस काही नसतं  पूर्ण झाले स्वप्न की आनंद होतो मनाला,  आणि नवीन स्वप्न घेती झेप, ह्या आनंदी मनात पुन्हा एकदा.... अपूर्ण राहिले स्वप्न, किंवा तुटली ती आशा, तर कुठे झेप घ्यावी हा पड़े प्रश्न, ह्या मनाला पुन्हा एकदा.....

मेहँदी.....

नाज़ुक गोऱ्या हाथांवर,  उठून दिसते मेहँदी त्यांवर..... सुरेख तिचा वास,  सुरेख तिचा रंग, सतत बघत रहावं अशी आहे ही मेहँदी.... रंग चढला आहे, मस्त अगदी दाट, काय खुणावते ही मेहँदी हे तिलाच फक्त माहीत.... लग्नाची चाहुल, कोण असेल तो नशिबात, ह्या दाट रंगलेल्या मेहँदी सारखं  कोणी पडेल का कधी प्रेमात....