बहिण-भाऊ
आई-बाबांबरोबर जसं एक सुंदर नातं असतं,
तसं दुसरं सुंदर नातं म्हणजे बहिण भावाचं.
बहिणीचा आधार असतो तो भाऊ,आई-बाबांबरोबर जसं एक सुंदर नातं असतं,
तसं दुसरं सुंदर नातं म्हणजे बहिण भावाचं.
भावाला करमत नाही त्या प्रेमळ बहिणीचा दुरावा.
लहान बहिण म्हणजे घरातील लाडकी,
तिच्यावर सतत असते भावाची सावली.
तिला होणारा त्रास त्याला न सांगता कळतो,
त्या त्रासाला हसू मध्ये तोच बदलू शकतो.
मुद्दाम चिडवणं, तिची कळ काढणं,
तिची मस्करी करणं हे करतो तो हक्काने.
जगात एकटेपणा कधीच वाटू देईना तो तिला,
चांगल्या वाईटाचा अर्थ तोच समजावी नीट तिला.
आई बाबा रागावले कि दोघं साम्भाळती ऐकमेकांना,
एकत्र जगती आयुष्य हसत खेळत समजून ऐकमेकांना.
रक्षाबंधनाच्या दिवशी घेती भावाकधून वचन,
नेहमीच रक्षा करील तिची असे न बोलता वदवून.
बहिण जाती सासुरवाडीला,
तेव्हाच कळती त्याला डोळ्यातील अश्रूंचा खरा अर्थ.
Comments