Skip to main content

Posts

Showing posts from August, 2011

का कुणास ठाउक.....

का कुणास ठाउक, पण कळेणासं झालय आजकल... मन कशातही लागत नाही, विचार हरवून गेलेत आजकल.... कुठे जावं, कसं जगावं, हा प्रश्न पडलाय ह्या हरवलेल्या मनाला.... घाबरून राहते मी आजकाल, भिऊ नकोस असं सांगते मी ह्या भित्र्या मनाला..... का कुणास घाबरत आहे हे मन समजेना, कुठे हरवलाय तो आत्मविश्वास शोधू कुठे कळेना.... वादळ उठ्लय मनात, मळभ चढलाय मनावर, वाटलं होतं पहाट नवीन ही आणेल आनंद ह्यापुढे आयुष्यभर!! आशा करते काळे ढग मनावरचे पळून जातील एक दिवस, सुंदर पहाट आणेल आनंद पुन्हा एक दिवस!!!