लागली ओढ़ घराची,
पटापट कामं आटपायची....
घरी निघाले सगळे घाईघाईने,
गर्दीतून वाट काढू लागले....
कधी एकदा आपल्या घरी जाईन,
मस्त गरमागरम जेवण जेवीन.....
आपल्या लोकांमध्ये बसून,
आरामात गप्पा मारेन.....
आनंद हा मनात असताना,
धडाम् असा आवाज कुठून आला कळेना.....
लोकांची धावपळ,
घाबरून जीव वाचवायला सगळी पळापळ.....
एका क्षणात काय घडलं काहीच समजेना,
बॉम्बस्फोट झाला हे मनास पटेना.....
काय चूक त्या साध्या लोकांची,
रक्तबंबाळ होऊन पसरली रक्ताची रांगोळी.....
का म्हणून निष्पाप जीवे जाती अशी,
अमानवी कृत्याला पडती मृत्युमुखी....
रोजची धावपळ चालूच असते जगण्याची,
नकळत अश्या घटना डोळ्यासमोर घडती.....
वाढती महागाई, वाढता भ्रष्टाचर, वाढती काळजी,
ह्यात फक्त गरीब मध्यमवर्गीयांचा जातो बळी.....
कधी होणार शहानिशा ह्याची,
की ह्यातही शासन राहणार हलगर्जी......
बॉम्बस्फोट आहेत आता आयुष्यातील एक भाग,
नाही सहन करणार, आता मनात बसला हा राग!!!!
पटापट कामं आटपायची....
घरी निघाले सगळे घाईघाईने,
गर्दीतून वाट काढू लागले....
कधी एकदा आपल्या घरी जाईन,
मस्त गरमागरम जेवण जेवीन.....
आपल्या लोकांमध्ये बसून,
आरामात गप्पा मारेन.....
आनंद हा मनात असताना,
धडाम् असा आवाज कुठून आला कळेना.....
लोकांची धावपळ,
घाबरून जीव वाचवायला सगळी पळापळ.....
एका क्षणात काय घडलं काहीच समजेना,
बॉम्बस्फोट झाला हे मनास पटेना.....
काय चूक त्या साध्या लोकांची,
रक्तबंबाळ होऊन पसरली रक्ताची रांगोळी.....
का म्हणून निष्पाप जीवे जाती अशी,
अमानवी कृत्याला पडती मृत्युमुखी....
रोजची धावपळ चालूच असते जगण्याची,
नकळत अश्या घटना डोळ्यासमोर घडती.....
वाढती महागाई, वाढता भ्रष्टाचर, वाढती काळजी,
ह्यात फक्त गरीब मध्यमवर्गीयांचा जातो बळी.....
कधी होणार शहानिशा ह्याची,
की ह्यातही शासन राहणार हलगर्जी......
बॉम्बस्फोट आहेत आता आयुष्यातील एक भाग,
नाही सहन करणार, आता मनात बसला हा राग!!!!
Comments
संताप आहे आणि helpless ही. एकट आपण काही करू शकत नाही..म्हणून काही चळवळीत मी भाग जरूर घेत आहे.
loved theses lines..
( बॉम्बस्फोट आहेत आता आयुष्यातील एक भाग,
नाही सहन करणार, आता मनात बसला हा राग!!!! )
Thanks a lot Niki.....