समजुन घे म्हणणारं प्रत्येक जण असतं,
पण समजुन घेणारं कुणीतरी प्रत्येकाकढे नसतं....
मला खुप कामं आहेत, मला आता वेळ नाही, मी आज भेटू शकत नाही,
पण तू समजुन घे....
हिरमुसल्या मनाने हसत ती समजुन घेते...
थोडासा राग, थोडीशी चिडचिड, थकून आलेला वय्ताग तिच्यावर निघतो....
शेवटी राग थंड करून, सगळ विसरून ती समजुन घेते.....
त्याला पाहिजे ते नेहमी मिळणार, त्याला हवं तेव्हा फिरण,
त्याचे आनंदाचे क्षण आपले समजुन आनंद साजरा करण...
त्याचे जीवन नेहमीच समजुन घेते ती,
पण तिच्या अबोल्तेला कधी कुणी समजुन घेतच नाही....
Comments