Skip to main content

Posts

Showing posts from October, 2011

दिवाळीची खरेदी......

आली आली दिवाळी आली, रस्त्यावरती गर्दी वाढली.... नवीन कोरे कपडे, फटाके व रोशनाई, आणि जोडीला भरपूर मिठाई...... लहान असो वा मोठे,  गरीब असो वा पैश्याने मोठे, सगळ्यांचीच उडाली धांदल दिवाळीच्या खरेदीसाठी..... पणत्या, रांगोळ्या, तोरणं, कंदील, आहेत त्यासोबत लाडू, शंकरपाळी,  चकली, करंजी ह्या सर्वांची ज़ोरदार तयारी..... सर्वांचे डोळे मिचकू लागले,  Discount वा Sale ह्यानकढे माना वळू लागले..... खिशाला पडला फटका तरीही, खरेदी मात्र करतील नक्की.... महागाईचे दर वाढले, खर्चाचा ही डोंगर वाढला, पण ह्या रोषणाईच्या सणाला, तयारी अगदी जोरात असते सगळ्यांची..... October Heat ज़ोरावर असती, घामाच्या धारा  ह्या रणरणत्या उन्हात वाहती, वर्षभर घाम गाळुन जमा केलेला प्रत्येक पैका, खरचं करायला मिळाले निमित्त, घरातल्या प्रत्येकाला..... असतात सण बरीच एका वर्षी, दिवाळी सणामध्ये आहे जादू वेगळीच... सुवासिक उटने, लक्ष्मीपूजनाचे बताशे वा, छोटेमोठे फटाके,  ह्या सणात लवकर उठून पणत्या लावायची मज्जा असते वेगळीच... दिवाळीच्या खरेदीसाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा!!!!!!