तोंड सांभाळून बोला, हे लक्षात ठेवलं पाहिजे सतत मला.. उगाच नको तिकडे अति उत्साह माझा, करतो कोंडी, आणि नात्यांमध्ये दुरावा.... पण माझ्या मनाचा उत्साह असतो, निव्वळ आनंद व प्रेमाचा, नसतो त्यात काही हेतु कुणालाही दुखवायचा ..... एखाद्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या आनंदाचे क्षण, सगळ्यांशी बोलून साजरा करावा एवढाच असतो हेतु माझा.... पण लक्षात ठेवेन नेहमी, की बोलावं, पण ज़रा तोंड सांभाळून....