मुंबई पुणे मुंबई, फिरलो मी खुप, राहिलो दोन्ही शहरात..... पण मुंबईची ओढ़ नेहमीच होती मनात..... कामासाठी राहिलो, पण जगण्यासाठी मुंबईलाच आठवाय्चो.... पेशवाई पुणे, अस्सल पुणेरी भाषा, कलात्मक शहर असतील म्हणत पुण्याला, पण मुंबईचा सरळ साधेपणा, लोकांची गर्दी, सतत असणारी धावपळ, माणुसकीची खरी ओळख आहे खरी कला माहिती फक्त मुंबईला...... मुंबईचा परिसर असला जरी अस्वच्छ, पण आहे इथल्या लोकांचे मन निर्मळ आणि स्वच्छ.... इथले लोक आहेत खरेखुरे , नाहित नुसती नाटकातील मुखवटे चढवलेली पात्रे... "आमची मुंबई" का म्हणतात ह्याचा अर्थ मला उमजला, जेव्हा झालो दूर मी ह्या सुंदर शहरापासून माझ्या.... कितीही झालो मोठा मी, कितीही कमावले पैसे मी, कितीही घेतल्या गाड्या मी, तरीही मुंबईचा "वडापाव" मात्र, रस्त्यावर माझ्या जुन्या मित्रांसोबतंच करेन बोटं चाटत फस्त......